Photo : तेलंगणात कापसाचे दर पाच हजारांवर, शेतकरी आक्रमक
सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तेलंगणा ( Telangana) राज्यात मागील काही दिवसांमध्ये कापसाचे 15 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. आता या ठिकाणी कापसाला सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस सध्या तेलंगणात पाच हजारांवर आला आहे. त्यामुळं तेलंगणा राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात प्रति क्विंटल 6000 रुपये दरानं कापसाची विक्री केली जात आहे.
कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी कापसाला वाढीव दर देण्याची मागणी करत आहेत.
पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं होतं. याचा मोठा फटका कापसासह अन्य पिकांना बसला होता. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्पादनात 50 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कापसाला प्रति क्विंटल 15 हजार रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. याविरोधात काही ठिकाणी शेतकरी आंदोलन देखील करत आहेत.
राज्य सरकारनं कापसाचा दर 15 हजार रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर सरकारनं कापसाच्या दरात वाढ नाही केली तर संपूर्ण राज्यात आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
महाराष्ट्रातही कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कापसाला 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.