Chhatrapati Sambhajinagar: भाजीपाल्यांची आवक वाढली, दर गडगडले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी, सध्या काय भाव चाललेत?
छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभावांमध्ये घसरण झाली आहे.
Market Yard
1/6
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी असलेली जाधववाडी भाजी मंडई येथे भाजीपाल्यांची आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळलेले पाहायला मिळाले.
2/6
टोमॅटो 10 रुपये किलो, कोथिंबीर 10 रुपयात 2 जुडी आणि पालक 10 रुपयांमध्ये 3 जुडी मिळते आहे.
3/6
भाजीपाल्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, पालेभाज्यांवर खर्च केलेला देखील निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
4/6
मेथीची 20 रुपयाला मिळणारी जोडी 10 रुपयात तीन मिळू लागल्यात.
5/6
आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळले आहेत. दर कोसळल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.
6/6
छत्रपती संभाजी नगरच्या जाधववाडी मंडित आवक वाढली होती. दर घटल्यामध्ये ग्राहकांमध्ये दिलासादायक चित्र आहे.
Published at : 05 Feb 2025 11:58 AM (IST)