Photo : वांग्याच्या नवीन वाणांची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार फायदा
शास्त्रज्ञांनी वांग्याच्या वाणांच्या नवीन जाती विकसित केली आहे. या वांग्याच्या नवीन जाती शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या असून, यातून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन वांग्याच्या जातींवर किटकांचा प्रादुर्भाव होणार नसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
शेती क्षेत्रात सातत्यानं नवनवीन संशोधन होत आहे. संशोधनातून कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या वांग्याच्या वाणांची (Brinjal varieties) निर्मिती केली जात आहे.
जालना (Jalna) जिल्ह्यातील बेजो शीतल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वांग्याचे नवीन वाण तयार केलं आहे. या कंपनीनं कंपनीने 'जनक' आणि 'BSS 793' नावाची हायब्रीड वांग्याचे वाण विकसित केले आहे.
येत्या काळात या वाणाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. कमी खर्चात वांग्याच्या या वाणातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती देखील शास्त्रज्ञांनी दिली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने ट्रान्सजेनिक तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या तंत्राच्या साहाय्याने वांग्याच्या जनक आणि बीटी बीएस-793 या नवीन जाती विकसित केल्या आहेत.
तंत्राच्या साहाय्याने वांग्याच्या जनक आणि बीटी बीएस-793 या नवीन जाती विकसित केल्या आहेत. या प्रजातीमध्ये Bt जनुक, Cry1 FA1 जनुक वापरण्यात आले आहे. याचे IARI ने पेटंट देखील घेतले आहे. या तंत्राचा वापर करून उत्तम दर्जाचा भाजीपाला तयार करता येत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
बेजो शीतल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2005 मध्ये या तंत्रज्ञानाचा परवाना घेतला होता. उद्यान विज्ञान विद्यापीठ, बागलकोट, कर्नाटक यांना ही चाचणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील बेजो शीतल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वांग्याचे नवीन वाण तयार केलं आहे. या कंपनीनं कंपनीने 'जनक' आणि 'BSS 793' नावाची हायब्रीड वांग्याचे वाण विकसित केले आहे