Honey bee : मधमाशांची संख्या घटली, कांद्यासह सूर्यफूलाचे बिजोत्पादन घटण्याची शक्यता
सध्या राज्यातील शेतशिवारात मधमाशांची (Honey bee) संख्या घटली आहे. यामुळं परागीकरण होत नसल्याचे दित आहे. याचा परिणाम म्हणून कांदा (Onion) आणि सूर्यफूलाचे (Sunflower) बिजोत्पादन (Seed production) घटण्याची शक्यता आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया समस्येमुळं आता कांदा आणि सूर्यफूलाचे चांगल्या दर्जाचं बियाणं मिळणंही मुश्किल झाल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
शेतशिवारात मधमाशांची संख्या (Honey bee) घटल्यानं कांदा आणि सूर्यफूल बीजोत्पादन करणारे शेतकरी चिंतेत आहेत. मधमाशा अतिशय कमी झाल्यानं परागीकरण होत नसल्यानं कांदा आणि सूर्यफूल बीज उत्पादन घटण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी (Farmers) दिली आहे.
मधमाशांची संख्या घटल्यानं फुलांमधून परागीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळं कांदा आणि सुर्यफुलाचं बिजोत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिवसेंदिवस नेहमी शेतशिवरात दिसणारे मधमाशांची पोळे आता कुठे दिसत नाहीत. त्यामुळं आता बियाणे उत्पादक शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत.
मधमाशांची संख्या घटल्यानं फुलांमधून परागीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळं कांदा आणि सुर्यफुलाचं बिजोत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतशिवरात दिसणारे मधमाशांची पोळे आता कुठे दिसत नाहीत. त्यामुळं आता बियाणे उत्पादक शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत.
मधमाशा फुलांकडे आकर्षित होऊन फुलांवर बसतात आणि त्यामुळं परागीकरण होऊन फुलांमध्ये चांगल्या उत्पादक क्षमतेच बीज तयार होतं.
मधमाशा कमी झाल्यानं आणि परागीकरण कमी झाल्यानं जे बीज तयार होतं त्याची उगवण क्षमता कमी असते. तर काही वेळेला ते बीज उगवत नाही.