वादळी पावसाचा शेतीला फटका, नंदुरबारमध्ये केळीच्या बागा आडव्या
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक ठिकाणी केळीच्या बागा (Banana Crop) जमिनदोस्त झाल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
वादळी पावसामुळं शेती पिकांच मोठं नुकसान झालं आहे.
केळीसह इतर फळबागांना देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका बसला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे.
द्यापही प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे पंचनामे केले नाहीत. यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मधुकर पाटील या शेतकऱ्यांचे एकूण 8 हजारपेक्षा अधिक केळीची झाडे जमिनदोस्त झाली आहेत.
6 जूनला मान्सूनचे राज्यात आगमन झाले असले तरी अद्याप संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय झाला नाही.
मान्सून सुरुवातीला कोकणात दाखल झाला. त्यानंतर मुंबईत दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे.
राज्याच्या विविध भागात आजही वादळी पावसाचा इशारा दिला आहे.