PHOTO : पावसाने उसंती घेतल्याने सिंधुदुर्गात नाचणी लागवडीला वेग, शेतशिवारं फुलली
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
04 Aug 2022 10:31 AM (IST)
1
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने नाचणी लागवडा वेग आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तर भरड शेती भागात पावसाने उसंत घेतल्याने भूईमुग लागवडीची लगबग सुरु झाली आहे.
3
मालवणमधील आचरा परिसरात भात लागवडी बरोबरच महत्त्वाचे पीक म्हणून भुईमूग, नाचणीची लागवड केली जाते.
4
त्यामुळे नाचणी लागवडीच्या काम करताना शेतकरी वर्ग दिसत असून शेती शिवारे फुलून गेली आहेत.
5
आपल्या आहारातील नाचणीचे महत्त्व आणि वाढत्या मागणीमुळे नाचणी पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे.
6
या पिकाची लागवड वरकस जमिनीत केली जाते.
7
नांगरणी करुन जमीन भुसभुशीत केल्यावर जमिनीवर शेणखत पसरले जाते.
8
काढलेली नाचणीची रोपे लावली जातात.
9
सध्या पावसाने उसंत घेतली असल्याने नाचणीच्या लागवडीकडे शेतकरी वळला आहे. यामुळे शेतशिवारात वर्दळ वाढली आहे.