आजपासून सिल्लोडच्या कृषी महोत्सवाला सुरुवात

Continues below advertisement

Agriculture festival Sillod

Continues below advertisement
1/9
आजपासून सिल्लोडच्या कृषी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे.
2/9
आजपासून (1 जानेवारी) औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं (Sillod Agriculture Festival) आयोजन करण्यात आलं आहे. 40 एकरावर हा कृषी महोत्सव भरवला गेला आहे.
3/9
या महोत्सवात कला, क्रीडा आणि संस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील असणार आहे. पण हा कृषी महोत्सव सुरुवातीपासूनच वादात अडकला. कृषी महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना गोल्ड, सिल्वर पासेस विक्री करण्याचा आणि पैसा गोळा करण्याचा टार्गेट दिल्याचा आरोप विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर केला होता.
4/9
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गैरहजर राहण्याची शक्यता आहे. काल बीडमध्ये असलेले फडणवीस आज औरंगाबादमध्ये का गैरहजर राहणार याची चर्चा सुरु आहे.
5/9
सत्तारांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तरीही औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी दांडी मारली आहे. शिरसाट हे आज मुंबईत असणार आहेत.
Continues below advertisement
6/9
सिल्लोड नगरीत प्रथमच या कृषी महोत्सवाचे आयोजन होत आहे. यामध्ये विविध पिकाचे, फळ पिकांची तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे
7/9
सर्व शेतकरी बांधवानी पुढील पाच दिवस चालणाऱ्या कृषी महोत्सवात सामील व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महत्वाचा भाग म्हणजे या कृषी प्रदर्शनात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं आहे.
8/9
राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी या महोत्सवात मिळणार आहे. तसेच विविध कंपनीचे स्टॉल्स लागणार आहेत.
9/9
या महोत्सवात कला, क्रीडा आणि संस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील असणार आहे. पण हा कृषी महोत्सव सुरुवातीपासूनच वादात अडकला. कृषी महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना गोल्ड, सिल्वर पासेस विक्री करण्याचा आणि पैसा गोळा करण्याचा टार्गेट दिल्याचा आरोप विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर केला होता.
Sponsored Links by Taboola