Agriculture Export : अन्नधान्याची निर्यात वाढली, आकडेवारी जाहीर
सध्या देशात अन्नधान्याचा (Food) पुरेसा साठा उपलब्ध आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गहू (Wheat), तांदूळ (Rice), मका, भरड धान्याचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळं अन्नधान्याच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
गहू, तांदळासह साखरेच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून सविस्तर आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of Food) देखील वाढली आहे. केंद्र सरकारनं निर्यातीच्या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात 40.26 टक्क्यांनी वाढून 3.33 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
बिगर बासमती तांदळाची निर्यातही 3.35 टक्क्यांनी वाढून 4.66 अब्ज डॉलर झाली आहे.
गव्हाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एप्रिल-डिसेंबर 2021 मधील 145.2 दशलक्षवरून गव्हाची निर्यात 4 टक्क्यांनी वाढून एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 150.8 दशलक्ष डॉलर झाली आहे.
साखर उत्पादनाच्या बाबतीतही भारत जगातील मोठा देश आहे. भारतातून अनेक देशांना साखरेची निर्यात केली जाते. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या आकडेवारीनसार चालू विपणन वर्ष 2022-23 मध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत देशातून 27.83 लाख टन साखर निर्यात झाली आहे.
गहू आणि तांदळाच्या निर्यातीतही मोठी वाढ झाली आहे.