onion : एक एकर कांद्यावर शेतकऱ्यानं फिरवला रोटाव्हेटर

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतच्या शेतकऱ्यानं एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत.

Ahmednagar onion News

1/10
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण येत असल्याचं चित्र दिसत आहे.
2/10
कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळं अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकऱ्यानं एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे.
3/10
कांद्याचे दर कोसळ्यानं शेतकरी चिंतेत आहेत. काही आपल्या शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत.
4/10
कांद्याला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे
5/10
कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकरी सुभाष निंबोरे यांनी एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे.
6/10
कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी हवालदिल
7/10
कांदाप्रश्नी भाजप-शिंदे सरकारनं तातडीने हस्तक्षेप करावा, किसान सभेची मागणी
8/10
सरकारनं कांदाप्रश्नी तोडगी न काढल्यास किसान सभेचा आंदोलनाचा इशारा
9/10
कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण
10/10
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
Sponsored Links by Taboola