Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापसाची आयात होणार
केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापसाची आयात करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयावर शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापसाची आयात करण्यात येणार आहे. यासाठी आयत शुल्कही माफ करण्यात आलं आहे.
कापूस आयातीवर लागू करण्यात आलेलं 11 टक्के शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातले परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात अंतर्गत येणाऱ्या विदेश व्यापार संचालनालयानं प्रसिद्ध केलं आहे.
2022 च्या आयातीचा विचार केला तर यावर्षी आयातीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
भारतातून कापूस किंवा रुई, सुताची निर्यात ठप्प आहे. अशातच परदेशातून भारतात कापूस आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय योग्य नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
देशातील जिनींग प्रेसिंग कारखानदार, व्यापारी, निर्यातदार आदींची संघटना असलेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने या सर्वांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. यावेळी कापूस आयातीसाठी कापसावरील 11 टक्के आयात शुल्क दूर करावे, अशी मागणी करण्यात आली होती.
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला विक्रमी दर पाहता यावर्षीही कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
ल्या आठवड्याभरात कापसाचे दर पंधराशे ते दोन हजार रुपयांनी घटले आहेत. सध्या कापसाचा 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे.
अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
कापूस आयातीसाठी कापसावरील 11 टक्के आयात शुल्क दूर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर ही मागणी मान्य करत आयात शुल्क माफ करण्यात आलं आहे.