Yavatmal Accident : यवतमाळमध्ये बेलगव्हान घाटात झालेल्या भीषण अपघातामध्ये (Yavatmal Accident) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बेलगव्हान घाटात अॅपे ऑटो पलटी झाल्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामध्ये जागीच चार जणांचा मृत्यू झाला तर उपचारावेळी दोन जणांनी प्राण सोडले. इतर प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. 


यवतमाळमधील पुसद दिग्रस रोडवरील बेलगव्हान घाटात एक ॲपे पलटी झाल्याने भीषण अपघात (Yavatmal Accident) झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून दोघांचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. इतर सर्व प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुसदच्या मेडिकेअर हॉस्पिटल येथे  उपचार सुरू आहेत.


ऑटो क्रमांक एम एच 29 -31172 यामध्ये धुंदी, वसंतपुर, धानोरा गावातील 11 ते 12 जण नवस करण्यासाठी पोहरादेवी जवळील उमरी येथे जात होते. त्यावेळी अचानक पुसद दिग्रस रोडवरील बापूजी अणे स्मारकाजवळ अॅपे ऑटो पलटी झाला. यामध्ये पार्वती बाई रमेश जाधव( 52)  राहणार वसंतपूर, ज्योतीबाई नागा चव्हाण (50) राहणार धुंदी, उषा विष्णू राठोड (44) राहणार धुंदी, लीलाबाई वसराम चव्हाण राहणार सिंगरवाडी, गणेश वसराम चव्हाण (62)  राहणार जवाहर नगर, सावित्रीबाई गणेश राठोड (40) वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. तसेच चालक ज्ञानेश्वर गणेश राठोड व इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना उपचाराकरिता मेडीकेअर हॉस्पिटल पुसद येथे तर काहींना नांदेड येथे दाखल  करण्यात आले आहे. 


अपघातातील मृतदेह शविच्छेदना करिता शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार इंद्रनील नाईक व आमदार निलय नाईक यांनी रुग्णालय रुग्णालयात येऊन जखमी प्रवाशांची, नातेवाईकांशी  विचारपूस करण्यात आली. मेडिकेअर  रुग्णालयाचे संचालक डॉ. सतीश चीद्दरवार यांच्याशी चर्चा करण्यात आली तसेच अत्यंत गंभीर असलेल्या दोन लहान बालकांना तात्काळ नांदेड येथे हलविण्यात आले आहे.