Continues below advertisement

यवतमाळ : शाळेच्या कामासाठी 80 हजारांचा लाच घेताना मोरगाव तालुक्यातील नवरगावच्या महिला संरपंचाला अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी तिने ही लाच मागितली होती. लाचलुचपत विभागाने (ACB Yavatmal) कारवाई करत सरपंचाला अटक केली असून तिच्यावर मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुचिता कुमरे असं महिला सरपंचाचं नाव आहे.

यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील नवरगावातील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर त्याचे बील काढण्यासाठी, बिलावर सही मागितली असता महिला सरपंचाने 80 हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी शासकिय कंत्राटदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

Continues below advertisement

Yavatmal ACB : लाचलुचपत विभागाची कारवाई

तपासणीनंतर महिला सरपंचाने लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने यवतमाळ लाचलुचपत विभागाने सरपंचाला अटक केली आणि तिच्यावर मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत विभागाने सापळा रचून सरपंच सुचिता कुमरे यांना अटक केली. शाळेच्या संरक्षण भिंत बांधकामाचे पूर्ण झालेल्या कामाच्या बिलाच्या चेकवर सही करण्यासाठी तिने 80 हजार रूपयांची लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले.

Bribe News : घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई

नांदेड जिल्ह्यातील नायगाव घरकुल लाच प्रकरणात पंचायत समिती नायगाव येथील 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट कार्यमुक्त करण्यात आलं. भाजप आमदार राजेश पवार यांनी अचानक कार्यालयाला भेट दिली होती, नागरिकांना घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे, आमदारांच्या (MLA) अचानक भेटीतही हे उघड झालं होतं.

लाच (Bribe) घेतल्याचं काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी मान्य केलं होतं. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट कार्यमुक्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे, लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नांदेड मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र जारी केले. त्यानुसार, 27 ऑक्टोबर रोजी 89-नायगांव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार, यांनी पंचायत समिती, नायगांव कार्यालयास भेट दिली. त्यावेळी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डाटा एन्टी ऑपरेटर व इतर अधिकारी घरकुल लाभार्थ्यांचे देयके काढण्यासाठी पैसे घेतात व जाणून बुजून तांत्रिक अडचण दर्शवून विलंब करतात, अशी कबुली देऊन स्वतः मान्य केल्याची व्हिडीओ क्लिप प्रसारमाध्यमांच्या स्वरुपात व्हायरल झालेली आहे. या व्हायरल व्हिडिओ क्लिपची दखल घेत पंचायत समितीमधील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा: