यवतमाळ : चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला जामीन मिळालाच होता, पण न्यायालयाच्या परिसरात त्याने थुंकल्याने न्यायाधीशानी तात्काळ जामीन रद्द केला आणि तुरुंगात रवानगी केली. यवतमाळ जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली.
चोरीच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड वणीच्या न्यायालयाने गोविंद जाधव या आरोपीला सुनावली होती. या प्रकरणात 22 जुलैला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात त्याने अपील केली. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर देखील केला. मात्र या कालावधीत आरोपीने गुटखा खाऊन न्यायालय परिसरातील तीन वेळा प्रतिक्षालयातील खांबावर पिचकारी मारली. नेमकी हीच बाब न्यायाधीश हेमंत सातभाई यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली आणि आरोपीला जामीन हक्क गमावून पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागली.
गोविंदा मनोज जाधव या आरोपीला नोटीस बजावून न्यायालयाच्या परिसरात थुंकल्याने 12 ऑगस्ट या प्रकरणी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. 12 ऑगस्ट परत न्यायालयात आला असता तो आरोपी मद्य प्राशन करून आल्याचं समोर आलं. वैद्यकीय तपासणीतही ही बाब उघड झाली. आरोपीने या प्रकरणात केलेलं गैरवर्तन सिद्ध झाल्याने, तसेच जामिनावर राहण्याच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी त्याची कारागृहात रवानगी केली.
ही बातमी वाचा: