यवतमाळ : राज्यातील रस्ते अपघाताच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. दररोज अपघाताच्या दुर्घटनेत प्रवाशांनी जीव गमावल्याचे वृत्त ऐकायले मिळते. कधी चार चाकी तर कधी दुचाकी वाहनांचे अपघात होतात. खराब रस्ते, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि हायस्पीड वाहनांमुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच, यवतमाळ आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका अपघातात दुचाकी डिव्हायडरला धडल्याने अपघात झाला, तर दुसऱ्या अपघातात ट्रॅक्टरला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर तुळजापूर मार्गावरील बलवंत मंगल कार्यालयासमोर दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रेम संतोष बावणे आणि रोहित आमटे असे मृतकाचे नाव आहे. वाघाडी येथून दोघेजण यवतमाळकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. सध्या येथील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे, हे काम सुरू असताना डिव्हायडर हे रस्त्याच्या मधोमध आहेत. त्यामुळे, या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या कोणत्याही प्रवाशांना हे डिव्हायडर दिसत नाहीत. त्यामुळेच, हे अपघात होत असल्याचे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, आजच्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय.
ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, दोघे ठार
गडचिरोलीवरुन चामोर्शीकडे येत असताना कुरुड बस थांब्याजवळ उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रतीक नीलकंठ निमसरकार (वय 26 वर्षे), सचिन विनायक रोहणकर (वय 26 वर्षे) अशी मृतांची नावे असून दोघेही चामोर्शी तालुक्यातील रहिवासी आहेत. मृतकांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णलाय चामोर्शी येथे आणण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा
अकोल्यात NEET ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ