Uddhav Thackeray Vidarbha Visit: सध्याच्या राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांच्या याच महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज  विदर्भ दौऱ्यानं होणार आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Visit) आहेत. 


आज पहिल्या टप्प्यात ते यवतमाळमध्ये (Yavatmal) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. वाशिममध्ये (Washim News) पोहरादेवीच्या (Poharadevi) दर्शनानं ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे सभा घेणार आहेत. तत्पूर्वी यवतमाळ आणि वाशिमच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील. दिग्रजच्या सभेनंतर उद्धव ठाकरे अमरावतीसाठी रवाना होणार आहेत.


पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray Vidarbha Tour: ठाकरेंचा विदर्भ दौरा,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा



बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. पक्षात पडलेली उभी फुट आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवीत येणार आहेत. पक्षातील फुटीनंतर शिंदे गटात गेलेले संजय राठोड आणि भावना गवळींच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार आहे. राज्यात बंजारा समाजाची असलेली मतदारसंख्या आणि बंजारा समाजातील पोहरादेवीचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व, यादृष्टीनं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला अनेक कारणांनी महत्व प्राप्त झालं आहे.  


'हिंदुत्वाची ढाल, महाराष्ट्राच्या विकासाची मशाल'; नागपूर विमानतळावर ठाकरेंच्या स्वागतासाठी होर्डिंग्स 


उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर उतरले की, ते थेट वाशीम जिल्ह्यात बंजारा समाजाचे शक्तीपीठ असलेल्या पोहरादेवी येथे जाणार आहेत. वाशिममध्ये (Washim News) पोहरादेवीच्या (Poharadevi) दर्शनानं ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर आकर्षक मजकुराचे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. ज्यात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'हिंदुत्वाची ढाल, महाराष्ट्राच्या विकासाची मशाल', असा करण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पुढील वाटचालीचा एक अंदाज यातून दिसून येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ABP C Voter Survey: अजित पवारांच्या बंडामागे थोरल्या पवारांचाच हात? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष, लोकांचं मत अजुनही...