Yavatmal News : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी जिर्णोद्धार केलेल्या यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात सीतानवमीच्या पर्वावर स्वयंसिद्धा सीता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील आठ महिलांना स्वयंसिद्धा सीता सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप होते. प्रमुख अतिथी माजी आमदार सरोज काशीकर, शेतकरी महिला आघाडीच्या प्रज्ञाताई बापट, वसुंधरा काशीकर, अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे, मधुसुदन हरणे उपस्थित होते.
आठ कर्तबगार महिलांचा स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने सन्मान
ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्थितीशी व समाजव्यवस्थेशी संघर्ष करून आपल्या पाल्यांना लव-कुशांप्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर, समाजातील प्रतिष्ठीत आणि सन्माननीय नागरिक म्हणून घडवले आहे, अशा कर्तृत्ववान धैयशील मातांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती काशीबाई मुठे (आर्वी जि वर्धा), डॉ.तारा राम राठोड (दिग्रस), श्रीमती रेखा कापसे (नाशिक) श्रीमती शारदा उंबरकर (वर्धा), श्रीमती मनीषा पवार (अमरावती), श्रीमती सुनीता गावंडे (कौलखेड जहांगीर अमरावती), श्रीमती मंदा लेंढारे (टाकळी दरणे, वर्धा), श्रीमती सुनीता ज्ञानेश्वर उंडे (रावेरी) या आठ कर्तबगार महिलांचा स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सीता मातेचे जगातील एकमेव मंदिर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सीता मातेचे जगातील एकमेव मंदिर आहे. पूर्णपणे खचलेल्या प्राचीन मंदिराचा युगात्मा शरद जोशी यांनी जीर्णोद्धार केला होता. देशात सगळीकडे फक्त रामनवमी साजरी होत असताना फक्त रावेरी येथेच सीता नवमी महोत्सव साजरा केला जातो.
इतर महत्वाच्या बातम्या