Yavatmal Crime : बेपत्ता असलेल्या एका इसमाची निर्घृण हत्या (Murder) केली त्यांनतर मृतदेह अर्धवट बांधकाम असलेल्या जुन्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत (Water Tank) फेकला. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील दारव्हा मार्गावरील चेतना वाईन बारच्या मागे लोहारा परिसरात ही घटना उघडकीस आली. विजय दामोधर टोळे (राहणार गिलानी नगर यवतमाळ) असं मृताचं नाव आहे. 


मारेकरी आणि मृत एका ठिकाणी 10 मे रोजी रात्री सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. त्यानंतर मारेकरी मृत विजय यांना दुचाकीवर घेऊन गेले. याप्रकरणी मृत विजय टोळे यांच्या नातेवाईकांनी अवधूतवाडी पोलिसात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरु असतानाच शुक्रवारी (12 मे) दोन जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांचीही असून चौकशी केली तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. 


Maharashtra Yavatmal Crime News : मारेकऱ्यांनी मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला


विजय टोळे यांना जीवे मारुन दारव्हा मार्गावरील चेतना वाईन बारच्या मागील अर्धवट बांधकाम असलेल्या एका अपार्टमेंटच्या पाणीच्या टाक्यात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांना मृत विजय टोळे यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये पाण्यात तरंगताना आढळून आला.


उपसरपंच पती आणि मुलांकडून नागरिकवर तलवारीने हल्ला


यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील निंगनुर ग्रामपंचायत अंतर्गत कारभाराबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवत असल्याने उपसरपंच महिलेच्या पती मुलांसह आणि दोन नातेवाईकांनी गावातील नागरिक फारूख खाँ शाब्बासखान यांच्यावर तलावारीने प्राणघातक हल्ला केला. नफारुख खान शाबाद खान राहणार निगनूर असे हल्ल्यात जखमीचे नाव आहेत. निंगनुर इथल्या ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार अधिनियमनानुसार माहितीचा अर्ज का टाकला? असं म्हणत चिडलेल्या उपसरपंच महिलेच्या पतीने माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांना गाडीतील तलवारीने कापून टाका अशी चिथावणी दिली आणि ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आलेल्या फिर्यादी फारुख खान शाबासखान याच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले. त्याच्या चिथावणीवरुन आरोपी साजिदखान वलीउल्लाखान, सद्दाम खान वल्ली उल्ला, इबादखान वलीउल्ला, इम्रानखान वलीउल्ला, वलीउल्ला खान अब्दुल्ला' राजिकखान कलीमखान या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बिटरगांव पोलीस करत आहे.


हेही वाचा


Yavatmal Crime : रक्ताच्या नात्यावरच घाव, यवतमाळमध्ये वर्षभरात 74 जीवे मारण्याच्या घटना, नागपूरलाही मागे टाकलं!