SSC Exam 2024 Yavatmal : दहावीचा (10th Board Exam) मराठीचा पहिला पेपर अवघ्या दहा मिनिटातच सोशल मीडियाववर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यवतमाळच्या ( Yavatmal) पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर दहावीचा मराठीचा पहिला पेपर फुटला होता. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांनी तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून पेपर व्हायरल करणाऱ्या मोबाइलधारकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत. मात्र अद्यापही संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही


 


दहावीच्या पेपरची एकूण 11 पाने सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हायरल


राज्यात 1 मार्चपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अवघ्या 10 मिनिटातच पेपर फुटल्याची घटना घडली होती. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे घडला होता. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी विकास मुळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याची माहिती मिळताच भरारी पथकाने केंद्र गाठून उपस्थितांची जबाब घेतला होता. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून पेपर व्हायरल करणाऱ्या मोबाइलधारकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही. सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी एन-501 सांकेतिक क्रमांकाच्या प्रश्नपत्रिकेचे 14,15,16,17 आणि इतर 7 पान, असे मिळून 11 पाने एका सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हायरल झाला होता.


 


पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त असूनही...


दहावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, ह्या दृष्टीकोनातून विविध पथके गठीत केली होती. तसेच विविध परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तरी देखील यवतमाळ मधील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर अवघ्या दहा मिनिटांत पेपर सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याची घटना घडली होती.


 


हेही वाचा>>>


धक्कादायक! वनरक्षक भरतीच्या अंतिम निवड परीक्षेत धावला चक्क डमी उमेदवार; मूळ उमदेवार छत्रपती संभाजीनगरचा, तर डमी जालन्याचा रहिवासी‎‎