यवतमाळ: यवतमाळमध्ये (Yavatmal) आज एसटी कर्मचारी संघटनांचा (ST workers) मोठा राडा पाहायला मिळाला. सनद रद्द झालेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी यवतमाळमधील हॉटेलमधून हा राडा लाईव्ह पाहिला. कार्यकर्त्याने व्हिडीओ कॉलवरून (Video Call) हा राडा सदावर्तेंना लाईव्ह दाखवला. एसटी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या यंदाच्या अहवालावर नथुराम गोडसेचा (Nathuram Godse) फोटो छापला आहे. गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टकरी जनसंघाचे (Kashtakari Jansangh) अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा नथुराम गोडसेचा फोटो आपल्या बैठकांमध्ये वापरला होता. त्यामुळे या सभेत राडा होणार याची कुणकुण सर्वांना होती. 
 
या फोटोमुळे यवतमाळ येथे आयोजित वार्षिक सभेच्या वेळी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने निषेध नोंदवल्याचे पाहायला मिळालं.


कामगार संघटनेचे सदावर्तेंवर आरोप 


याबाबत बोलताना महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एबीपी माझाला म्हणाले की,"नथुराम गोडसेचं उदात्तीकरण महाराष्ट्रात किंबहुना देशात खपवून घेतलं जाणार नाही. नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यामुळे आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गुणरत्न सदावर्ते यांना येता देखील आलं नाही. आजच्या सभेवेळी त्यांच्या खुर्च्या देखील रिकाम्या होत्या".


आजच्या घडीला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी बँक सदावर्ते यांच्यामुळे अडचणीत आली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांना संप सुरू केला आहे. एखादा कर्मचारी आजारी असेल तरी कुठल्याही प्रकारची त्याला वैद्यकीय मदत मिळण्याइतपत देखील पैसे मिळत नाहीत. एक प्रकारे बँक अडचणीत आणण्यामध्ये सदावर्ते यांचा मोठा हात आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. 


संघटनेमधील राडा, सदावर्तेंनी LIVE पाहिला


दरम्यान,  नथुराम गोडसेच्या फोटोवर आक्षेप घेतल्यामुळे, एसटी कर्मचाऱ्यांच्या सभेत मोठा गदारोळ झाला. हा गदारोळ सुरु असताना गुणरत्न सदावर्ते त्याठिकाणी उपस्थित नव्हते. नथुराम गोडसे हे हॉटेलवर विश्रांती घेत होते. मात्र हा राडा एक कर्मचारी त्यांना व्हिडीओ कॉलवरुन लाईव्ह दाखवत होता. त्यावेळी सदावर्ते हे हॉटेलमधील बेडवर झोपून हे सर्व लाईव्ह पाहात होते. 


राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते नेमकं काय म्हणाले?


"आमसभेत शरद पवारांच्या बगलबच्चांनी गदारोळ सोडा, तोंडातून शब्दसुद्धा काढू शकले नाहीत. कष्टकरी जय श्रीराम, वंदे मातरम म्हणत होते. स्वतःला कामगार म्हणून  घेणाऱ्या संघटनेची घाणेरडी कृती आहे. ज्या अहवालावर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो आहे, ज्या अहवालावरती हिंदू राष्ट्र भारत लिहले, या अहवालाला हात लावण्याचा प्रयत्न केला.  म्हणून संघटनेच्या संदीप शिंदे याला झोडपून बाहेर काढला.", असं सदावर्तेंनी सांगितलं.


ज्या प्रकारे शरद पवारांच्या विचारांना जसं झोडपून काढलं, तसंच त्यांच्या बगलबच्च्याना झोडपून हाकूलून लावले आहे. अखंड भारताचे भाग्यविधाते नथुरामजी गोडसे यांची भूमिका प्रत्येक भारतीय काळजात ठेवून आहे. गांधीजींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहेत. पाकिस्तानधार्जिना विचार शिल्लक नाही. म्हणून असे विचार काँग्रेस कधीही संपवू शकणार नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजी गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.  


VIDEO : गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?



संबंधित बातम्या 


एसटीमधील सदावर्ते गटावर सभासदांचा गंभीर आरोप, 110 कोटींच्या ठेवी काढल्याचं सहकार आयुक्तांना पत्र  


Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची आता वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात उडी, नागपूर कराराची होळी करत केला एल्गार