Yavatmal News: यवतमाळमध्ये एका हनी ट्रॅप प्रकरणाच्या कारवाईवर संशय आल्याने एका अधिकाऱ्यासह सहा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. निलंबनाचा हा निर्णय घेण्यात आल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून यात सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह सायबर आणि एलसीबीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निलंबन झालेल्या मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, जमादार गजानन डोंगरे, शिपाई विशाल भगत, कवीश पाळेकर, सलमान शेख, मोहम्मद भगतवाले आणि पंकज गिरी यांचा समावेश आहे. 


शहरातील अरूणोदय सोसायटीत राहणाऱ्या संदेश मानकर या तरूणाने अनन्या सिंग ओबेरॉय नावाने वर्षभरापूर्वी एका बनावट फेसबूक अकाऊंट उघडले होते. अशात संदेश याची दिल्लीतील उच्चशिक्षित डॉ. गोयल यांच्या बनावट फेसबूक अकाऊंटवर मैत्री झाली. यावेळी बहिणीचे अपहरण झाल्याचे सांगत संदेशने डॉ. गोयल यांना बहिनीला वाचविण्याकरीता दोन कोटीची आवश्यकता असल्याचे सांगितले. डॉ. गोयल यांनी दिल्लीतून दोन कोटीची रक्कम घेवून थेट यवतमाळ गाठले. त्यानंतर संदेशने  इस्टाग्राम, फेसबूक आणि व्हाट्सअप अकाऊंट आणि नंबर बंद करीत डॉ. गोयल यांच्याशी संपर्क तोडला होता. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने अवधुतवाडी पोलिसात तक्रार दिली होती. 


या प्रकरणी पोलिसांनी अनन्या सिंग ओबेरॉस उर्फ संदेश मानकर याला ताब्यात घेत कोट्यावधीची रोख जप्त केली होती. त्यानंतर काही दिवसांनी कारागृहातून बाहेर येताच संदेश याने नातेवाईकांच्या जसराणा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणातील तपासात संशय आल्याने एका संघटनेने अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक चंद्रकिशोर मिना यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत मीना यांनी थेट यवतमाळ गाठून तपास अधिकारी आणि कारवाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारपूस केली होती. अश्यात या प्रकरणी एका अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


फॉरेन्सिक अहवालातील चुकीची शिक्षा परदेशी नागरिकाला का? दोन लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Nashik News : नाशिकमध्ये साडे चार हजार विद्यार्थ्यांची भव्य रॅली, ढोल ताशांचा गजर, देशभक्तीमय वातावरण 
Radhanagari Dam : पावसाचा जोर ओसरला, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद, अजूनही तीन दरवाजातून विसर्ग सुरु