पिंपरी चिंचवड: निवडणूक आयोगाने प्रभागात जाऊन मतदार याद्या बनवणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. त्यामुळं पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad Mahanagarpalika) प्रारुप मदातर (Voter List) याद्यांमध्ये घोळ झाला, असा आरोप सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरेखेंनी (Amit gorkhe) केला. अशा कारभारामुळं विरोधक निवडणूक आयोगावर वेळोवेळी आक्षेप घेतात का? असा प्रश्न विचारला असता, निवडणूक आयोगाने तंतोतंत काम करावं अशी अपेक्षा गोरेखेंनी (Amit gorkhe) व्यक्त केली. आता निवडणूक आयोगाकडे वेळ कमी आहे, त्यांनी लवकरात लवकर या त्रुटी संपवाव्या. अशी मागणी गोरेखेंनी (Amit gorkhe) आयोगाकडे केली. या आधी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केलेत, त्यात आता भाजपची ही भर पडली आहे.
Amit gorkhe: मृतांची नावे वगळली नाहीत
महाविकास आघाडीनंतर आता महायुतीतील भाजपने देखील निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पिंपरी चिंचवड मधील प्रारूप मतदार याद्या जाहीर झालेल्या आहेत, भाजपने देखील यामध्ये काही आक्षेप असल्याचे नोंदवले आहेत, पिंपरीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले, पिंपरी विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये दुबार नाव आली आहेत, मृतांची नावे वगळली नाहीत, एका एका प्रभागात 400 ते 500 नाव आहेत, आज माझ्यासोबत आमचे काही माजी नगरसेवक आले आहेत आम्ही सगळेजण इथे आलो आहे, कारण अनेक प्रभागांमधल्या नावांची अदलाबदली झालेले आहेत, इतर मतदारसंघातली नाव आमच्या पिंपरी मतदार संघात आलेली आहेत, मोठ्या प्रमाणावर दुबार नाव दिसून येत आहेत, मला वाटतं निवडणूक आयोगाने यावर व्यवस्थित काम करावं, कारण दिवस कमी आहेत, आणि जे योग्य नाव आहे ती लवकरात लवकर लावून घ्यावेत, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.
Amit gorkhe: निवडणूक आयोगाने या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण...
निवडणूक आयोगाकडून गल्लोगली फिरून लोकांचे नाव घेणे अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं दिसत नाही. म्हणूनच हा घोळ झालेला दिसत आहे पण निवडणूक आयोगाकडे किंवा या प्रशासकीय यंत्रणेकडे दिवस कमी आहेत, त्यामुळे आपले जे निर्णायक मतदार आहेत जे खऱ्या अर्थाने मतदान करण्यासाठी रस्त्यावर येतात, त्यांच्या भल्यासाठी निवडणूक आयोगाने या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजेत, याबाबत विरोधकच काय तर आम्ही देखील निवडणूक आयोगाने तंतोतंत काम करावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण हा नागरिकांचा प्रश्न आहे. मतदारांचा प्रश्न आहे आणि तो निवडणूक आयोगाने व्यवस्थित सोडवावा, हीच आमची विनंती आहे, असंही विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी म्हटलेलं आहे.