Yashomati Thakur on Bala Darade : राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते आगामी महापालिका निवडनुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे का? राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अशा पद्धतीने बोलणं योग्य आहे का? दुसरी गोष्ट जे सत्ताधारी आहे ते भावनेच्या भरात बोलतात त्यांनी हे लक्षात घ्यावं, राहुलजी यांनी जर इतिहास सांगायला सुरुवात केली तर त्या इतिहासामध्ये बदल होऊ शकत नाही. काल आज आणि उद्या जो इतिहास आहे तो तोचं राहणार आहे. आणि राहिला प्रश्न राहुल गांधी यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तर त्यांना कुणी हात लावून दाखवा, असा थेट इशारा देत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे (Bala Darade) यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतलाय.
राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे (Bala Darade) यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही, असंही बाळा दराडे यांनी सांगितले. बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील उप महानगरप्रमुख आहेत. त्यांनी थेट राहुल गांधी यांना धमकी दिल्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या वक्तव्यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देत दराडे (Bala Darade) यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला जातोय.
....तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही- यशोमती ठाकूर
आम्ही जरी गांधीवादी विचारांचे आहोत शांतीप्रिया आहोत. मात्र आमच्या नेत्याला जर का कोणी अशा पद्धतीने बोलणार असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, हे नक्की. असा इशाराही काँग्रेसने त्या यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही युती म्हणून राहतो तेव्हा आम्ही पक्षाची आचारसंहिता पाळत असतो. तशीच आचारसंहिता त्यांनी देखील पाळली पाहिजे. अशी आमची अपेक्षा आहे. राहिला प्रश्न राहुल गांधी यांचा तर, राहुलजी अशा घरात न येतात ज्यांनी मोठ्या प्रमाणात आतंकवाद सोसला आहे. मात्र आज जर त्यांना अशा पद्धतीने जर कोणी बोलत असेल तर ते स्वतःचा दर्जा खालवताय. मात्र आमच्या नेत्याला जर का कोणी अशा शब्दात बोललेल तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही असा पुनरुच्चार करत काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांनी सज्जड दम दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या