Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 64 दिवस उलटले आहेत. तरीही युक्रेनवरील संकटाचे ढग कमी होण्याचे नाव घेत नाहीत. रशियाच्या हल्ल्याने युक्रेनमधील अनेक शहरे उध्वस्त झाली आहेत. हे दोन्ही देश युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीत. दरम्यान, युक्रेनला शस्त्रसाठा पुरवणे युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे रशियाने गुरुवारी सांगितले आहे.


क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इतर देशांकडून युक्रेनला अवजड शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे ही एक प्रवृत्ती आहे, ज्यामुळे भविष्यात युरोपची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असं म्हणत त्यांनी थेट युरोपला धमकावले आहे.


दिमित्री पेसकोव यांनी बुधवारी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहेत. युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा सुरू राहिल्यास युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. याच दरम्यान रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की रशियन सैनिकांचा सामना करण्यासाठी जगभरातील सर्व शक्तिशाली देशांकडून शस्त्रांची मागणी करत आहेत. परंतु युक्रेनला मदत करणारे सर्व देश अशी परिस्थिती टाळू इच्छितात ज्यामुळे नाटो आणि मॉस्को यांच्यात थेट संघर्ष होऊ शकेल.


दिमित्री पेसकोव यांनी यापूर्वी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या वतीने इशारा दिला की, युक्रेन रशियन युद्धात हस्तक्षेप करतील किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील अशा देशांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे सर्व मार्ग रशियाकडे खुले आहेत. यासोबतच रशियाने अमेरिकेला युक्रेनला शस्त्रे पुरवू नयेत, असे सांगितले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Coca-Cola : कोका-कोलामध्ये खरंच कोकेन होतं? औषध ते शीतपेय असा प्रवास करणाऱ्या कंपनीचा रंजक इतिहास
Elon Musk : एलोन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाद उफाळला; ट्विटरच्या मॉडरेशनवर टीका
Elon Musk : एलन मस्क खरेदी करणार कोका-कोला कंपनी, त्याचं कारणही सांगितलं