नवी दिल्ली : झिका व्हायरसविरोधात अमेरिका लढत असताना, आता आणखी एका विषाणूशी लढा द्यावा लागणार आहे. अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘यलो फीव्हर’बाबत सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.   अमेरिकेतील वॉशिंग्टनस्थित जॉर्ज टाऊन विद्यापीठातीन डॅनियल लूसी आणि लॉरेन्स गोस्टिन यांनी याबाबत बोलताना भिती व्यक्त केली की, यलो फीव्हर आगामी काळात जागतिक आरोग्य संकट बून शकतं.   लूसी आणि गोस्टिन यांच्या म्हणण्यानुसार, “इबोला आणि झिका व्हायरसवेळी जागतिक आरोग्य संघटनेने पावलं उचलण्यास विलंब केला होता. त्यामुळे झिका, इबोलावेळी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती आता यलो व्हायरसवेळी व्हायला नको.”   जागतिक आरोग्य संघटनेनुसार, यलो फीव्हरची साथ पसरल्याची सर्वात पहिल्यांदा अंगोलामध्ये जानेवारी महिन्यात समोर आलं होतं आणि चार महिन्यांपर्यंत अंगोलात 2 हजार 149 यलो फीव्हरची प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये 277 जणांचा मृत्यू झाला आहे.   चीन, कांगो आणि केन्यामधील अंगोलामधून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून यलो फीव्हरची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.   यलो फीव्हर संक्रमित डासांमार्फत प्रसार होणारा रोग असून, यावर योग्य वेळी योग्य उपाय न मिळाल्यास रुग्णाच्या मृत्यूची शक्यता वाढते.   हे पूर्ण संशोधन आणि अभ्यास अमेरिकेतील ‘जेएएमए’ मासिकात प्रकाशित झआला आहे.