रोम : जगातील सर्वात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. इटलीतील एमा मोरॅनो यांनी वयाच्या 117 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. एमा यांना एकोणिसाव्या शतकात जन्माला आलेली एकमेव व्यक्ती असल्याचं बोललं जात आहे. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1899 रोजी इटलीमध्ये झाला होता. एमा यांनी तीनही शतकं पाहिली आहेत.
इटलीमध्ये जन्मलेल्या एमा यांनी दोन महायुद्ध, इटलीतील 90 हून अधिक राजकीय सत्ता पाहिल्या आहेत. त्या आपल्या 8 भावंडांमध्ये सर्वात जास्त आयुष्य जगलेल्या एकमेव आहेत. एमा रोज तीन अंड्याचा आपल्या आहारात समावेश करत होत्या. त्यातील दोन अंडी त्या कच्ची खात होत्या.
एमा यांची आईसुद्धा 91 वर्षांचं आयुष्य जगली होती, तसंच त्यांच्या बहिणींनीही वयाची शंभरी ओलांडली होती.