World TB Day 2022 : जागतिक टीबी किंवा क्षयरोग दिन (World TB Day 2022) दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो. कारण याच दिवशी 1882 मध्ये जर्मन चिकित्सक आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कोचने यांनी टीबीचा जीवाणू म्हणजेच मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला होता. त्यामुळे क्षयरोगाच्या निदानामध्ये आणि उपचारामध्ये मोठी मदत मिळाली होती. या योगदानाबद्दल, रॉबर्ट कोचने यांना 1905 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आला. 


यामुळेच जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी क्षयरोगाचे सामाजिक, आर्थिक आणि हानिकारक परिणामांबद्दल जगभरात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. क्षयरोगाबद्दल लोकांना जागरूक करणे तसेच त्याला प्रतिबंध करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. 


जागतिक क्षय दिनाची तारीख आणि महत्त्व (World TB Day Date and Importance) :


जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजीच साजरा करतात. याचं कारण डॉ. रॉबर्ट कोचने यांनी या दिवशी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियमच्या शोधाची घोषणा केली. कोच यांच्या घोषणेवेळी हा रोग प्राणघातक होता. आणि युरोप आणि अमेरिकेतील सात पैकी एकाचा मृत्यू होत होता. त्यामुळे या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे. 


WHO च्या मते, टीबी अजूनही जगातील सर्वात घातक संसर्गजन्य प्राणघातक रोगांपैकी एक आहे. दररोज सुमारे 4000 लोक क्षयरोगामुळे आपला जीव गमावतात. 2000 पासून, क्षयरोगाचा सामना करण्यासाठी जागतिक प्रयत्नांमुळे सुमारे 63 दशलक्ष लोकांचे नुकसान झाले आहे. 


जागतिक क्षयरोग दिनाचा इतिहास (World TB Day History) :


24 मार्च 1892 रोजी, जर्मन चिकित्सक आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कोचने यांनी घोषित केले की त्यांना क्षयरोगाचे कारण सापडले आहे- टीबी बॅसिलस. त्यांनी हा शोध बर्लिन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ हायजीनमधील शास्त्रज्ञांच्या गटाशी शेअर केला. 1982 मध्ये, त्यांच्या शोधानंतर 100 वर्षांनी, इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्यूबरक्युलोसिस अँड लंग डिसीजने (IUATLD) 24 मार्च रोजी जागतिक क्षय दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली. तथापि, 1995 मध्ये WHO आणि युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीद्वारे दशकभरानंतर जागतिक क्षय दिवस साजरा करण्यात आला. 


जागतिक क्षयरोग दिनाची थीम 2022 (World TB Day Theme) :


क्षयरोगाला टीबी असंही म्हटलं जातं. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक थीम तयार करण्यात येते. या वर्षीची थीम 'Invest to End TB. Save Lives.' अशी आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha