World Tallest Living Woman: तुर्कीच्या रूमेसा गेलगीचे गिनीज व वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वांत उंच महिला म्हणून नाव नोंदवले गेले आहे. रूमेसाची उंची 7 फूट 0.7 इंच आहे. उंची मोजल्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रूमेसा गेलला हयात असणारी जगातील सर्वांत उंच महिला हा किताब दिला.
24 वर्षाची असणारी रूमेसा 'वीव्हर सिंड्रोम' या आजाराशी झुंज देत आहे. या आजारामध्ये उंची असामान्यपणे वाढत असते. हा एक प्रकारचा जेनेटिक डिसऑर्डर आहे. वीव्हर सिंड्रोम असल्याने आणि उंची मुळे रूमेसाला व्हीलचेअरचा वापर करावा लागतो. 'स्काय न्यूज' च्या रिपोर्टनुसार रूमेसाने सांगितले, ' एखाद्या व्यक्तिला झालेल्या नुकसानात काही तरी फायदा नेहमी असतो. जसे असाल तसे स्वत:ला स्विकारा. आपल्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि प्रयत्न करत राहा. '
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलगीचे 2014 मध्ये जिवीत असलेली सर्वांत उंच टीनएजर म्हणून नाव नोंदवले होते. वीव्हर सिंड्रोममुळे रूमेसा ही सामान्य व्यक्तींसारखे जीवन जगू शकता नाही. तिला चालण्यासाठी वॉकिंग फ्रेम आणि व्हीलचेअरचा वापर करावा लागतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एडिटर इन चीफ क्रेग ग्लेनडेने सांगितले की, 'रिकॉर्ड बुकमध्ये रूमेसाचे पुन्हा स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट आहे.'
जगातील सर्वांत उंच पुरूष
जगातील सर्वांत उंच पुरूष म्हणून सुल्तान कोसेन यांची नोंद झाली आहे. 2018 मध्ये त्यांची उंची 8 फूट 2.8 इंच होती. सुल्तान यांचा जन्म 10 डिसेंबर 1982 मध्ये झाला. सुल्तान यांची उंची ते 10 वर्षाचे असल्यापासून अचानक वाढायला लागली. आई, वडील आणि चार भावंड असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबामधील इतर सदस्यांची उंची ही साधरण आहे.
Health Care Tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे; अनेक आजारांवरही गुणकारी