World Oceans Day 2021 : जागतिक महासागर दिनाच्या निमित्तानं संयुक्त राष्ट्रांकडून समुद्रात प्लास्टिकमुळं होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी काही शाश्वत प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या महासागरांना वाचवा, अशा आशयाचा हॅशटॅग जोडत महासागर दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघटनांकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. यासोबत एक व्हिडीओही जोडण्यात आला आहे. 


महासागरांविषयी विचार करण्यासाठी अवघं एक एक मिनिटाचा वेळ द्या. आपल्या महासागरांमध्ये 80 टक्क्यांहून जास्त जैवविविधता जोपासली जाते. 3 बिलियन नागरिक मत्याहारावर अवलंबून आहेत. 10 पैकी 1 व्यक्ती उदरनिर्वाहासाठी मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहे, असं या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. महासागरांना वाचवण्यासाठी आपलीही भूमिका आहे, असं सांगत स्थानिक मासेमारी व्यवसायाला चालणा देण्यापासून प्लास्टिकमुळं होणारं सागरी प्रदुषण थांबवण्यापर्यंतचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. 


Himalayas : अंतराळातून असा दिसतो पर्वतराज हिमालय; दृश्य पाहून नेटकरी अवाक्










महागागर नसेल तर जीवसृष्टीच धोक्यात येईल या महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचचं यानिमित्तानं लक्ष वेधण्यात आलं आहे. महासागरांप्रती आभारभावना व्यक्त करणं हा या दिवसामागचा मुख्य हेतू आहे. अन्नसाखळीपासून ते अन्नसाठा पुरवठ्यापर्यंत आणि प्राणवायुपासून वातावरणापर्यंत प्रत्येक गोष्टी हे महासागर अतीव महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळं त्यांचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे हेच या दिवसाच्या निमित्तानं शक्य त्या परींनी सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येतं.