बिजिंग : ट्रेनमध्ये किंवा मेट्रोत बसायला जागा मिळाली नाही, तर अनेकांच्या मनाची घालमेल होते. आपल्या देशात तर स्त्रीदाक्षिण्य दाखवत, अनेक पुरुष स्वत: ची जागा खाली करुन महिलांना देतात. पण चीनमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका महिलेला तरुणाने जागा देण्यास नकार दिल्याने, तिने चक्त त्याच्या मांडीवर बसण्याचा प्रताप केला आहे.

चीनच्या नानजिंग शहरातील मेट्रोत हा प्रकार घडला आहे. मेट्रोतील तरुणाने महिलेला बसण्यासाठी जागा दिली नाही म्हणून, तिने चक्क त्याच्या मांडीवर जाऊन बसण्याचा प्रताप केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

वास्तविक, तरुण बसलेली जागा महिलांसाठी राखीव होती. त्यामुळे ती जागा आपल्याला मिळावी यासाठी महिलेने तरुणाला समजावून सांगितलं. पण पण तरुणानेही हटवादीपणा करत, जागा देण्यास नकार दिला.

यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. अखेर तरुण जागा खाली करण्यास तयार नसल्याने, त्या महिलनेने जी कृती केली, ते पाहून सर्वजण आवाक झाले. ती महिला चक्क त्या तरुणाच्या मांडिवरच बसली. महिलेच्या या कृतीमुळे तरुणाची बोलतीच बंद झाली होती. त्याला काय करावे हे सुधरत नव्हते.

दरम्यान, यानंतर त्याने त्या महिलेला जागा दिली की नाही याबाबतचा संपूर्ण व्हिडीओ उपलब्ध नाही. पण सोशल मीडियात या व्हिडीओची कमालीची चर्चा सुरु आहे.

घटनेचा व्हिडीओ पाहा