मोरक्को: स्पेनच्या सीमेवर एका 22 वर्षीय महिलेचा अजब कारनामा समोर आला असून, या महिलेने आपल्या सूटकेसमध्ये एका 19 वर्षीय मुलाला कोंबून स्पेनमध्ये नेण्याचा प्रताप केलाय. या महिलेला मोरक्कोजवळी स्यूताच्या सीमेवर अटक करण्यात आली असून तिची चौकशी करण्यात येत आहे.
स्पेनच्या सिव्हिल गार्डने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सूटकेसमधून 19 वर्षीय मुलाला घेऊन जात होती. तिला स्यूता सीमेजवळून पकडल्यानंतर तत्काळा या बॅगेतील मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखाल करण्यात आले.
या महिलेने जेव्हा ट्रॉलीमध्ये ही सुटकेस सर्वात वर ठेवल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. यावेळी ही महिला संबंधित एजंटसोबत बोलत असताना घाबरलेली असल्याचे स्पेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्यूता हा मोरक्का जवळील असा भाग आहे, ज्याची सीमा थेट आफ्रिकेला जोडते. याच मार्गाने आफ्रिकेतील प्रवासी स्पेनमध्ये येऊन वास्तव्य करत आहेत.
दरम्यान, स्पनेच्या सिव्हील गार्डनी दिलेल्या माहितीनुसार, याच आठवड्यात मानव तस्करीचे आणखी एक प्रकरण समोर आले होते. यामध्ये गीनच्या महिला आणि पुरुषाची आधिकाऱ्यांनी मानवी तस्करीपासून मुक्तता केली होती. या दोघांनाही एका गाडीत बंद करुन नेण्यात येत होते.