त्याचबरोबर 1992 पासून मी ब्रिटनमध्ये राहत आहे, मग मी भारतातून फरार कसा? भाजपचे प्रवक्ते मला पोस्टर बॉय का बनवत आहेत? असे सवाल मल्ल्याने भाजप नेत्यांना विचारले आहेत. मल्ल्याने आज ट्विटरच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले आहेत.
त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मी एक मुलाखत पाहिली, या मुलाखतीत ते म्हणाले की, विजय मल्ल्या बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन फरार झाला आहे. परंतु आमच्या सरकारने त्याची 14 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पंतप्रधानांच्या कबुलीनंतरही भाजपचे प्रवक्ते माझ्या मागे का लागले आहेत?
कर्जबुडव्या व्यापारी मल्ल्याला भारत सरकारने फरार घोषित केले आहे. तो सध्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यर्पणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी भारताकडून कार्यवाही सुरु आहे. भारताने त्यासाठी ब्रिटन सरकारकडे मागणीदेखील केली आहे.