मुंबई : अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया (Indian Rupee) मोठ्या दबावाखाली आहे. बाजार उघडताच रुपया प्रथमच 90 रुपये प्रति डॉलरच्या खाली घसरला आणि विक्रमी घसरण नोंदली. मजबूत डॉलर, विदेशी गुंतवणुकीचा बाहेर जाणारा प्रवाह आणि अस्थिर जागतिक वातावरण, या सर्वांचा परिणाम रुपयावर स्पष्टपणे दिसतो. मात्र ही परिस्थिती फक्त भारतापुरती मर्यादित नाही, जगातील अनेक देशांची चलने यापेक्षा खूपच दुर्बल आहेत.
Weakest Currency 2025 : लेबनानी पाउंड
जगातील सर्वात दुर्बल चलन म्हणजे लेबनानचे लेबनानी पाउंड (Lebanese Pound LBP). लेबनान गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात अडकलेले आहे. सरकारची अस्थिरता, भ्रष्टाचार, बँकिंग व्यवस्थेचे पतन आणि परकीय चलनसाठ्याचा तुटवडा यामुळे LBP ची किंमत कोसळली आहे.
1 LBP = 0.000011 USD
1 USD = 89,819.51 LBP
Iranian Rial : दुसऱ्या क्रमांकावर ईराणी रियाल
जगातील दुसरी सर्वात दुर्बल मुद्रा म्हणजे इराणचा रियाल (Iranian Rial IRR). अमेरिका आणि इतर देशांच्या आर्थिक निर्बंधांमुळे इराण जागतिक अर्थव्यवस्थेपासून जवळपास दूरच राहिला आहे. तेलाशिवाय अर्थव्यवस्थेत विविधता नाही, महागाई प्रचंड आणि राजकीय तणाव कायम असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.
1 IRR = 0.000024 USD
1 USD = 42,112.11 IRR
Vietnamese Dong : व्हियतनामचा डोंग
जगातील कमजोर चलनांमध्ये व्हियतनाम डोंग (Vietnamese Dong – VND) देखील आहे.
1 VND = 0.000038 USD
1 USD = 26,370.02 VND
व्हियतनामची अर्थव्यवस्था वाढत असली तरी सरकार निर्यात वाढावी म्हणून डोंगचे मूल्य जाणूनबुजून कमी ठेवते. त्यामुळे ते दुर्बल दिसते, पण परिस्थिती लेबनान–इरणसारखी गंभीर नाही.
Indian Rupee Vs Dollar : भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
भारताचा रुपया 2025 मध्ये 90 प्रति डॉलरपर्यंत घसरला असला तरी तो जगातील सर्वात कमजोर चलनांच्या टॉप 25 यादीतही नाही. भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी असून महागाई, कर्ज, राजकीय स्थैर्य आणि आर्थिक धोरणांच्या दृष्टीने भारताची स्थिती तुलनेने मजबूत आहे. त्यामुळे रुपया कमजोर होतो, पण तो जगातील सर्वात दुर्बळ चलनांमध्ये अजिबात येत नाही.
जगातील टॉप 3 सर्वात दुर्बल चलने (2025)
लेबनानी पाउंड (LBP)
इरणियन रियाल (IRR)
वियतनामी डोंग (VND)
ही बातमी वाचा :