Elon Musk Partner Shivon Gillis: टेस्ला (Tesla) आणि SpaceX चे सीईओ एलन मस्क (Elon Musk) झिरोधाचे कोफाउंडर निखिल कामत (Zerodha Cofounder Nikhil Kamat) यांच्या पॉडकास्टमध्ये उपस्थित होते. या पॉडकास्टमध्ये एलन मस्क यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून प्रोफेशनलसह अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या दरम्यान एलन मस्क यांनी सर्वांच्या भुवया उंचावणारा खुलासा केलाय. एलन मस्क यांनी खुलासा केलाय की, त्यांची पार्टनर शिवॉन जिलिस (Shivon Zilis) भारतीय वंशाची आहे. तसेच, मस्क यांनी त्यांच्या मुलाच्या नावाबाबतही महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

Continues below advertisement

एलन मस्क यांनी पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं की, त्यांची पार्टनर शिवॉन जिलिस भारतीय वंशाची आहे... तर त्यांच्या मुलाचं नाव 'शेखर' ठेवलंय, ज्या भारताशी खास कनेक्शन आहे. मस्क यांनी मुलाचं नाव शेअर ठेवण्यामागचं कारणही सांगितलं, ते म्हणाले की, "शेखर हे नाव नोबेल पारितोषिक विजेते भारतीय-अमेरिकन खगोलभौतिकशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलंय."

एलन मस्क नुकतेच झिरोधाचे को-फाऊंडर 'पीपल बाय WTF'मध्ये उपस्थित राहिलेले. त्यांनी सांगितलं की, "तुम्हाला माहिती आहे, ते मला माहीत नाही, पण माझी पार्टनर, शिवॉन, अर्धी भारतीय आहे. माझ्या एका मुलाचं मधलं नाव चंद्रशेखर यांच्या नावावरून 'शेखर' ठेवलंय..."

Continues below advertisement

दरम्यान, भारतीय-अमेरिकन खगोलभौतिकशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांना 1983 मध्ये नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं. त्यांनी ताऱ्यांच्या रचनेशी आणि उत्क्रांतीशी संबंधित भौतिक प्रक्रियांवर महत्त्वाचं सैद्धांतिक अभ्यास केलेला.

शिवॉन जिलिसचा भारताशी काय संबंध? 

पॉडकास्टमध्ये ज्यावेळी मस्क यांना विचारण्यात आलं की, त्यांची पार्टनर शिवॉन  कधी भारतात राहिलीय का? तर, यावर बोलताना मस्क यांनी सांगितलं की, भारताशी तिचं नातं पालकांमुळे आहे, तिथे ती कधी राहिली नाही... मस्क यांनी सांगितलं की, शिवॉनला लहानपणीच दत्तक घेण्यात आलं होतं. तिचे वडील बहुधा विद्यापीठात शिकणारे परदेशी विद्यार्थी होते. शिवॉन कॅनडामध्ये वाढली आणि नंतर येल विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्वज्ञानाचं शिक्षण घेतलं. आज, ती मस्क यांच्याच ब्रेन-टेक कंपनी, न्यूरालिंक इथे ऑपरेशन्स आणि स्पेशल प्रोजेक्ट्सची संचालिका आहे. यापूर्वी तिनं OpenAI आणि Tesla या दोन्ही कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. तिच्या कारकिर्दीमुळे तिला फोर्ब्स आणि लिंक्डइनच्या प्रभावशाली तरुण व्यावसायिकांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

शिवॉन जिलिस कोण?

शिवॉन गिलिस बऱ्याच काळापासून तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करतेय. ती 2017 मध्ये न्यूरालिंकमध्ये सामील झाली आणि सध्या ती कंपनीच्या ऑपरेशन्स आणि स्पेशल प्रोजेक्ट्सची संचालिका आहे. तिनं येल विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि आईस हॉकी संघात गोलकीपर होती. त्यानंतर तिनं व्हेंचर कॅपिटलमध्ये जाण्यापूर्वी आयबीएम आणि ब्लूमबर्गमध्ये काम केलेलं. 2016 मध्ये, तिनं एआयवर लक्ष केंद्रीत केलेलं आणि ओपनएआयमध्ये सामील झाली, जिथे ती संचालक मंडळाची सर्वात तरुण सदस्य बनली. 

मस्क आणि शिवॉन यांना मुलं किती? 

मस्क आणि शिवॉन यांना चार मुलं आहेत. जुळी मुलं स्ट्रायडर आणि अजूर, मुलगी आर्केडिया आणि मुलगा सेल्डन लिकरगस. मस्क म्हणाले की, कुटुंब आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखणं आव्हानात्मक आहे, पण ते एकत्रितपणे हे सर्व सांभाळतात.