विजय मल्ल्यावर एसबीआयसह 17 भारतीय बँकांचं 9 हजार 91 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारनं अनेकदा अर्ज-विनंत्या केल्या होत्या. त्यानंतर आज पोलिसांनी मल्ल्याला लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता अटक केली.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स विकत घेणाऱ्या, एफ वन टीमसाठी पैसा लावणाऱ्या आणि ललनांच्या कॅलेंडरवर करोडो उधळणाऱ्या मल्ल्यानं एसबीआयसह 17 बँकांना चुना लावला आहे. विजय मल्ल्याला वेस्ट मिन्स्टर कोर्टात आज हजर करण्यात आलं. पण कोर्टानं विजय मल्ल्याला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला.
कर्ज बुडवेगिरी करत विजय मल्ल्यांनं स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इतर सहकारी बॅंकांचे जवळपास 9000 कोटी रुपये बुडवत 2016 साली ब्रिटनमध्ये पळ काढला होता.
आयडीबीआयचेही 720 कोटी रुपये बुडवल्याप्रकरणीदेखील विजय मल्ल्या यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं.
काय आहे प्रकरण?
किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे.
मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.
काही महिन्यांपूर्वी ईडीने विजय मल्ल्याची 1411 कोटींची मालमत्ता आयडीबीआय बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मल्ल्याच्या बँक खात्यातील 34 कोटी रुपये, बंगळुरु आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट, चेन्नईमधील 4.5 एकरचा औद्योगिक भागातील प्लॉट, 27.75 एकर कॉफीची बाग, यूबी सिटीमधील निवासी घर, तसेच बंगळरुमधील किंगफिशर टॉवरचा समावेश आहे.
संबंधित बातम्या: