लंडन: विजय मल्ल्या फरार घोषित देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला अखेर आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. भारताच्या सुचनेनंतर स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी मल्ल्याला अटक केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
विजय मल्ल्याला आज लंडनच्या वेस्ट मिन्स्टर येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, विजय मल्ल्याला भारताकडे सुपूर्द करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
कर्ज बुडवेगिरी करत विजय मल्ल्यांनं स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इतर सहकारी बॅंकांचे जवळपास 9000 कोटी रुपये बुडवत 2016 साली ब्रिटनमध्ये पळ काढला होता.
आयडीबीआयचेही 720 कोटी रुपये बुडवल्याप्रकरणीदेखील विजय मल्ल्या यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं.
काय आहे प्रकरण?
किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.
काही महिन्यांपूर्वी ईडीने विजय मल्ल्याची 1411 कोटींची मालमत्ता आयडीबीआय बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मल्ल्याच्या बँक खात्यातील 34 कोटी रुपये, बंगळुरु आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट, चेन्नईमधील 4.5 एकरचा औद्योगिक भागातील प्लॉट, 27.75 एकर कॉफीची बाग, यूबी सिटीमधील निवासी घर, तसेच बंगळरुमधील किंगफिशर टॉवरचा समावेश आहे.
मल्ल्याचा गोव्यातील बंगला लिलावात
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विजय मल्लाची गोव्यातील किंगफिशर व्हिलाचा लिलाव करण्यात आला. अभिनेते सचिन जोशीनं यांनी हा व्हिला विकत घेण्याची तयारी दर्शवली.
32 वर्षीय सचिन जोशी हे ‘जेएमजे ग्रुप ऑफ कंपनीज्’चे उपाध्यक्ष असल्याचं त्याच्या वेबसाईटवर लिहिलं आहे. अझान, मुंबई मिरर, जॅकपॉट यासारख्या चित्रपटांमध्ये तो झळकले होते.
गोव्याच्या कंडोलिम भागात असलेला हा शानदार व्हिला विकत घेण्यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील डझनभर उद्योगपतींनी आणि एका मीडिया ग्रुपने रस दाखवला होता. मात्र सप्टेंबरमध्ये 85 कोटींची रक्कम जाहीर झाल्यावर फार कोणी पुढे आलं नाही. त्यानंतर ही रक्कम कमी करुन 73 कोटींवर आणण्याती आली.
लिलावात ठरलेल्या मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत या व्हिलासाठी मोजावी लागेल. त्यामुळे जोशींना 73 कोटींपेक्षा जास्त किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या: