US White House Cocaine : अमेरिकेच्या (America) व्हाइट हाऊसमध्ये (White House) म्हणजेच राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी अंमली पदार्थ सापडले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 2 जुलै रोजी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या वेस्ट विंगमध्ये कोकेन सापडलं होतं. या घटनेनंतर व्हाईट हाऊसमधील संबंधित परिसर रिकामा करण्यात आला आहे. व्हाईट हाऊसमध्ये सापडलेल्या कोकेन आलं कसं आणि याचा मालक नक्की कोण आहे, यासंदर्भात सध्या चौकशी सुरू आहे.


व्हाइट हाऊसमध्ये सापडलेलं कोकेन बायडन यांच्या मुलाचं?


अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये कोकेन सापडलं, त्यावेळी राष्ट्राध्यक्ष निवासस्थानी उपस्थित नव्हते. त्यावेळ बायडन हे 4 जुलै रोजीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मॅरीलँडमधील कप डेव्हिड येथे कुटुंबासोबत गेले होते. यादरम्यान, व्हाइट हाऊसमध्ये कोकेन सापडलं. यासोबत बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांचं नाव जोडलं जात आहे. त्यांना अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचं बोललं जात आहे.


कोकेनसोबत हंटर बायडन यांचा काय संबंध?


व्हाइट हाऊसमध्ये सापडलेल्या कोकेनसोबत हंटर बायडन यांचा संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे हंडर बायजन यांना ड्रग्स व्यसन असल्याची चर्चा आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, बायडन यांचा मुलगा हंडर बायडन आणि त्यांचं कुटुंब व्हाइट हाऊसमध्ये किती दिवस आणि कधीपर्यंत वास्तव्यास होते, याबाबत तपास आणि चौकशी सुरु आहे. हंटर बायडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये कोणत्या खोल्यांचा वापर केला, त्यांचा वावर होता, त्याभागातही तपास सुरु आहे.


दरम्यान, हंटर बायडन यांनी 2021 मध्ये सांगितलं होतं की, दोन वर्षांपासून ते अंमली पदार्थांपासून दूर आहेत. हंटर बायडन व्हाइट हाऊसमध्ये वास्तव्यास होते, असा दावा आता केला जात आहे. यासंदर्भात तपास करण्यात आहे. मात्र, यासंदर्भात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. 


व्हाइट हाऊसमध्ये कोकेन आलं कुठून?


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाइट हाऊसमध्ये कोकेन मिळाल्यानंतर ते वेस्ट विंग लायब्ररीत तयार केल्याचे प्राथमिक तपास अहवालात आढळून आलं आहे. हे ठिकाण भूमिगत (Underground) आहे आणि सार्वजनिक क्षेत्र आहे. मात्र, कोकेन सापडल्यानंतर, खबरदारीच्या तपासासाठी वेस्ट विंग लायब्ररी परिसर बंद करण्यात आला. वेस्ट विंग लायब्ररी सार्वजनिक क्षेत्र असल्याने अनेक लोक येथे काम करतात. येथे लोकांचा नियमित वावर असतो, अनेक जण येथे भेट देतात.


याशिवाय, हंटर बायडन यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये हंटर बायडन लास वेगासच्या रस्त्यावर 172 मैल प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवताना दिसत आहेत. ही घटना आणि हा व्हिडीओ आता कोकेनशीही जोडलेला जात आहे. मात्र,  हा व्हिडीओ 4 वर्षे जुना असल्याचं तपास अहवालात आढळून आलं आहे.