US President Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या टेक कंपन्यांना नियुक्त्यांबाबत मोठा संदेश दिला आहे. ट्रम्प यांनी कंपन्यांना भारतासह इतर देशांमधून नोकऱ्या देणे थांबवण्यास सांगितले आहे. परिणामी, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची कठोर भूमिकेमुळे जगभरातील नोकरदार वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी वॉशिंग्टन इथं आयोजित AI Summit दरम्यान ट्रम्प यांनी ही कठोर भूमिका मांडत अमेरिकी नागरिकांच्या कौशल्याला वाव देण्याचा आग्रही सूर या कंपन्यांना उद्देशून आळवलाय.
खरं तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (23 जुलै 2025) वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एआय शिखर परिषदेला हजेरी लावली. या आर्टिफिशियल (एआय) शिखर परिषदेला संबोधित करताना अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन कंपन्यांनी आता चीनमध्ये कारखाने बांधण्याऐवजी किंवा भारतातील तांत्रिक कामगारांना कामावर ठेवण्याऐवजी देशांतर्गत नवीन नोकऱ्या निर्माण करण्यावर आणि प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
राष्ट्रपती ट्रम्प यांनी तंत्रज्ञान उद्योगाच्या विचारसरणीवरहि केली टीका
कार्यक्रमाला संबोधित करताना, ट्रम्प यांनी तंत्रज्ञान उद्योगाच्या जागतिक विचारसरणीवर टीका केली आणि म्हणाले की, या मानसिकतेमुळे अनेक अमेरिकन लोक दुर्लक्षित वाटतात. त्यांनी आरोप केला की, "काही मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला आणि प्रचंड नफा कमावला, परंतु जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचा मुख्य पर्याय अमेरिकेबाहेरील देशात आहे. पण आता ते दिवस संपले आहेत, आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या राजवटीत असे होणार नाही." ते म्हणाले, "आमच्या सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला, परंतु चीनमध्ये त्यांचे कारखाने बांधले, भारतातून कामगारांना कामावर ठेवले आणि त्यांचे नफा आयर्लंडमध्ये जमा केले आणि या काळात त्यांनी त्यांच्याच देशातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले."
अमेरिकेला प्रथम स्थान द्यावे, अशी आमची इच्छा - डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्प म्हणाले, "आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ची शर्यत जिंकण्यासाठी सिलिकॉन व्हॅली आणि त्यापलीकडे देशभक्तीची आणि देशाप्रती निष्ठेची एक नवीन भावना निर्माण होणे आवश्यक आहे. आम्हाला अशा अमेरिकन टेक कंपन्यांची आवश्यकता आहे ज्या अमेरिकेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. आम्हाला तुम्ही अमेरिकेला प्रथम स्थान द्यावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे."
हे देखील वाचा: