ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खात्मा केला मात्र त्याचा मुलगा हामजाने आता ओसामाची जागा घेतली आहे. ओसामा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हामजा कट रचत आहे. यामुळे त्याने अमेरिकेविरोधात काही दहशतवादी कारवाई करण्याआधीच तो अमेरिकेला हवा आहे. त्याचमुळे त्याच्यावर 10 लाख डॉलरचा इनाम अमेरिकेने जाहीर केला आहे.
VIDEO | मसूद अजहर पाकिस्तानात असल्याची पाक परराष्ट्रमंत्र्यांची माहिती | जम्मू-काश्मीर | एबीपी माझा
गेल्या काही दिवसांपासून अल कायदा ही दहशतवादी संघटना शांत आहे, मात्र ते आत्मसमर्पण नाही. आम्हाला याबाबत कोणतीही चूक करायची नाही. अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे हल्ला करण्याची क्षमता आणि कारण या दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळे आम्हाला हामजाने काही कारवाई करण्याआधी तो हवा आहे असे अमेरिकेतले अधिकारी नॉथन सेल्स यांनी म्हटले आहे.
अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनने अमेरिकेतल्या ट्विन टॉवरवर विमान हल्ला केला होता. ज्या घटनेत अडीच हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. त्याचा ठाव ठिकाणा समजताच त्याला अमेरिकेने अबोटाबादमध्ये ठार केले होते. आता अमेरिकेला हाजमा हवा आहे कारण हाजमा बिन लादेन हा अल कायदासह इतर जिहादी संघटनांचा प्रमुख झाला आहे.
VIDEO | जमात-ए-इस्लामी जम्मू काश्मीर संघटनेवर केंद्राकडून बंदी | नवी दिल्ली | एबीपी माझा