US School Shooting : अमेरिकेमध्ये (America) सातत्याने गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा अमेरिकेतील शाळेत गोळीबार (US Firing) झाल्याची भीषण घटना घडली आहे. अमेरिकेतील नॅशव्हिल शहरातील एका खासगी ख्रिश्चन शाळेत झालेल्या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर एक महिला होती आणि तिला पोलिसांनी घटनास्थळी झालेल्या चकमकीत ठार केलं. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं पण, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये हा हल्ला झाला. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण त्याआधीच गोळीबारात अनेक जण जखमी झाले होते.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी मनरो कॅरेल ज्युनियर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी जखमींना मृत घोषित केलं. या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 






गोळीबारात अनेक जण जखमी


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला हल्लेखोर शाळेच्या दरवाजातून इमारतीत घुसली होती आणि ती पळून जात असताना, चर्चच्या दुसऱ्या मजल्यावर पोलिसांशी सामना झाला. ज्याचा परिणाम नंतर चकमकीत झाला. खरं तर, अमेरिकेत सोमवारी एका महिला हल्लेखोराने टेनेसीच्या नॅशविल येथील शाळेला लक्ष्य केलं आणि हल्ला केला. हल्लेखोर महिलेने अंधाधुद गोळीबार केला. 


विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं


या घटनेनंतर शाळेत उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांना पोलीस संरक्षणात सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. गोळीबारामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह चर्चमध्ये आणण्यात आलं. शाळेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 2001 मध्ये स्थापन झालेल्या शाळेत अंदाजे 200 विद्यार्थी आणि 33 शिक्षक आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gun Firing In USA : अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच; एकाच दिवसांत दोन घटना, नऊ जण ठार