वॉशिंग्टन : अमेरिका (USA) आणि इराण (Iran) यांच्यात होणाऱ्या इस्लामाबाद चर्चा 2.0 (Islamabad Talks 2.0) पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांनी लवकरच मोठा करार होण्याची शक्यता व्यक्त केली असून इराणच्या नागरिकांचे कौतुकही केले. मात्र, या स्तुतीनंतर लगेचच ट्रम्प यांनी कडक इशारा देत सांगितले की, जर इराणने अमेरिकेसोबत करार केला नाही, तर पुन्हा बॉम्बहल्ले सुरू होऊ शकतात. त्यामुळे चर्चेआधीच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Continues below advertisement

US Iran Relations : कराराबाबत सकारात्मक संकेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की सध्या अमेरिका अत्यंत मजबूत स्थितीत असून इराणसोबत चांगल्या कराराची शक्यता आहे. त्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुज (Strait of Hormuz) वर अमेरिकेचे नियंत्रण असल्याचेही म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की इराणकडे फारसे पर्याय नसून, त्यांना करार करावाच लागेल.

Ceasefire Strategy : युद्धविरामाचा ताकद वाढवण्यासाठी वापर

सीएनबीसी (CNBC) ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत स्थितीत आहे. युद्धविरामाचा वापर अमेरिकेने आपली ताकद वाढवण्यासाठी केला. आम्ही हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहोत आणि सीजफायरच्या आधीपेक्षा अधिक ताकदवान आहोत, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

Continues below advertisement

Iran Deal Warning : ‘डील झाली नाही तर हल्ला करणार’

ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, त्यांनी समजदारीने वागून अमेरिकेसोबत करार करावा. अन्यथा मोठी कारवाई होऊ शकते. त्यांनी एका संशयित जहाजाचा उल्लेख करत म्हटले की, त्यामध्ये काही धोकादायक वस्तू सापडल्या असून त्यामागे चीनचा (China) हात असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

Military Action Threat : बॉम्बहल्ल्याचा इशारा

ट्रम्प यांनी सांगितले की, जर चर्चेत लवकर प्रगती झाली नाही, तर सैनिकी कारवाई पुन्हा सुरू होऊ शकते. इंटरव्यूदरम्यान बॉम्ब हल्ल्याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले, 'मला वाटते बॉम्बहल्ले होतील' असे वक्तव्य करत त्यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली.

ही बातमी वाचा: