अमेरिकेचे दोन B-1BS आणि चार F-35BS ही लढाऊ विमानं तर दक्षिण कोरियाचे चार F-15K या फायटर जेट या युद्ध सरावात सहभागी झाले होते. तर उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पाठोपाठ क्षेपणास्त्र चाचणी केल्याने युद्धाचे ढग जमा झाले आहेत.
उत्तर कोरियाने चालवलेली शस्त्रास्त्रांची स्पर्धा तात्काळ थांबवावी, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेकडून वारंवार देण्यात येत आहे. मात्र तरीही उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे उत्तर कोरियावर वचक बसवणे हा या युद्ध सरावामागचा हेतू असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या :