US Air Force : अमेरिकेने (America) दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेकडून दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरुच असून पुन्हा एकदा अमेरिकेला यामध्ये यश मिळालं आहे. अमेरिकेने ड्रोन हल्ला करत आयसिसच्या (ISIS) आणखी एका म्होरक्याला कंठस्नान घातलं आहे. अमेरिकन वायू सेनेनं सीरियामध्ये लपून बसलेल्या ISIS च्या प्रमुख दहशतवाद्याला ठार केलं आहे. अमेरिकेने सीरियामध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा प्रमुख ओसामा अल-मुहाजिरचा खात्मा केला आहे. अमेरिकेने सीरियाच्या पूर्वेकडील दहशतवादी तळाला लक्ष्य करत दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. अमेरिकन प्रशासनाने निवेदन जारी करत या संदर्भात माहिती दिली आहे. 


अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक


युएस सेंट्रल कमांडने यासंदर्भात माहिती देताना जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, शुक्रवारी 7 जुलै रोजी पूर्व सीरियातील तळावर एमक्यू-9 ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांना रशियन विमानांच्या हस्तेक्षपालाही सामोरं जावं लागलं. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, युएस सेंट्रल कमांडने सीरियाच्या पूर्वेकडील दहशतवादी तळावर हल्ला केला, यावेळी अमेरिकेला रशियाच्या विमानांनाही सामोरं जावं लागलं. यावेळी रशियासोबत दोन तास चकमक चालली.


इस्लामिक स्टेटचा प्रमुख ओसामा अल-मुहाजिरचा खात्मा


अमेरिकेच्या सैन्याने रविवारी याबाबत माहिती देताना सांगितलं की, त्यांनी पूर्व सीरियामध्ये इस्लामिक स्टेटचा नेता ओसामा अल-मुहाजिर याचा खात्मा केला आहे. यूएस एअर फोर्सने जारी केलेल्या व्हिडीओमधील दिसत आहे की, बुधवारी सीरियावर US MQ-9 रीपर ड्रोनजवळ रशियन SU-35 उडत आहे. अमेरिकेने रशियन लढाऊ विमाने सीरियावर अमेरिकन ड्रोनचा हल्ल्याचा व्हिडीओ जारी केला आहे.


यूएस एअर फोर्सकडून व्हिडीओ जारी


यूएस एअर फोर्सने बुधवारी रशियन विमाने आणि एमक्यू-9 ड्रोन यांच्यात दोन तासांची चकमकीचा व्हिडीओ जारी केला आहे. यादरम्यान, MQ-9 रीपर्स ड्रोनने रशियन विमानांना पळवून लावण्यासाठी उत्तम कामगिरी केल्याचं अमेरिकन वायू दलाने सांगितलं आहे. रशियाच्या विमानांकडून अमेरिकेच्या स्ट्राईकमध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेवर चिंता व्यक्त करताना, यूएस एअर फोर्स सेंट्रलने एक निवेदन जारी करून सीरियामध्ये कार्यरत असलेल्या रशियन हवाई दलाच्या कारवाईचा निषेध केला.