Crude Oil: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका इतर देशांना मॉस्कोशी व्यापार न करण्याच्या सल्ला दिला होता. ज्यानंतर अनेक देशांनी रशियासोबत आपले व्यापार संबंध कमी केले होते. दरम्यान, रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर दिल्याने अमेरिका भारतावर संतापला होता. मात्र आता सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) या थिंक टँकचा अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, अमेरिका भारतापेक्षा रशियाकडून जास्त इंधन खरेदी केले आहे.


या अहवालात दावा करण्यात आला आहे की, युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून जितक्या कच्च्या तेलाची खरेदी केली आहे, त्यापेक्षा जास्त कच्च्या तेलाची खरेदी अमेरिकेने केली आहे. रशियाच्या कच्च्या तेल निर्यातदारांच्या यादीत भारत 20 व्या क्रमांकावर आहे, तर अमेरिका दोन स्थानांनी वर आहे, म्हणजे 18 व्या क्रमांकावर आहे.


जर्मनी प्रथम क्रमांकावर 


युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्यात जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे. इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर चीन, चौथ्या क्रमांकावर नेदरलँड आणि पाचव्या क्रमांकावर तुर्की आहे. सहाव्या क्रमांकावर फ्रान्स, सातव्या क्रमांकावर बेल्जियम, आठव्या क्रमांकावर स्पेन, नवव्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आणि दहाव्या क्रमांकावर पोलंड.


युद्धानंतर रशियावर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत 


दरम्यान, युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा स्थितीत रशियाने भारताला स्वस्तात तेल खरेदी करण्याची ऑफर दिली. रशियाच्या ऑफरनंतर रिलायन्ससह इतर काही कंपन्यांनी एकूण 30 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक युरोपीय नेत्यांनी त्यांना विरोध केला होता.


महत्वाच्या बातम्या :