नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. गेल्या तीन वर्षात यूक्रेनमधील विविध शहरांमध्ये रशियाने हल्ले करून ती शहरं बेचिराख करण्याचा प्रयत्न केला. रशियाच्या सैन्य दलानं यूक्रेनमध्ये घुसून बॉम्ब वर्षाव केला होता. यूक्रेननं या हल्ल्याद्वारे रशियाचं अब्जावधींचं नकसान केलं आहे.   

आता यूक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला आहे यूक्रेनच्या सैन्य दलाने चतुराईनं रशियाच्या एअरबेस वर हल्ला केला आणि बॉम्बे वर्षाव करणाऱ्या विमानांना उद्धवस्त केलं. यूक्रेननं या हल्ल्याचं नियोजन गेल्या दीड वर्षांपूर्वी केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर काम करत लक्ष्य अचूक टारगेट करण्यात आलं.

यूक्रेनच्या सुरक्षा सेवा विभागाने रशियाच्या चार एअरबेसवर हल्ले केले. त्यामध्ये रशियाच्या चाळीस विमानांचं नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. यूक्रेन The Kyiv Independent एका संस्थेने सुरक्षा सेवांच्या सूत्रांनुसार माहिती दिली आहे.

रिपोर्टनुसार ऑपरेशनचं नाव ऑपरेशन स्पायडरवेबहे निश्चित केलं होतं. या हल्ल्याच्या योजनेवर दीड वर्ष काम करण्यात आलं. या हल्ल्यासाठी यूक्रेननं फर्स्ट-पर्सन-व्यू ड्रोनचा वापर केला. ज्याला ट्रकमध्ये मध्ये बनवलेल्या मोबाईल केबिन्समध्ये लपवून रशियात पाठवण्यात आलं. जेव्हा योग्य वेळी आली तेव्हा त्या केबिन्सचे छत रिमोटद्वारे उघडण्यात आले आणि ड्रोनद्वारे थेट रशियन बॉम्बर्स विमानांना टारगेट करण्यात आलं. 

यूक्रेननं बेलाया एअरबेस, ओलेन्या एअरबेस, डियाघिलेव एअरबेस, इवानोवे एअरबेस या चार हवाई तळांवर हल्ले केले. यूक्रेनच्या एसबीयूनुसार ड्रोन हल्ल्यात A-50, Tu-95 आणि Tu-22 M3 या बॉम्बर्स विमानांना लक्ष्य करण्यात आलं. रशियाकडून या विमानांचा वापर यूक्रेनवर मिसाईल हल्ले करण्यासाठी केला जात होता. ड्रोन हल्ल्यात झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती समोर आलेली नाही. एसबीयूकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत विमानं जळताना पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल करण्यात व्हिडिओमध्ये ड्रोन ट्रकमधून उडताना पाहायला मिळतं. रशियाच्या इरकुत्स्कचे गव्हर्नर इगोर कोबजेव यांनी स्रेदनी गावातील एका सैन्य ठिकाणावर ड्रोन हल्ला झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ड्रोनचा सोर्स एक ट्रक होता. रशियातील मुरमांस्कचे गव्हर्नर आंदेरस चिबीस यांनी देखील हल्ल्यांच्या घटनेला दुजोरा दिला आहे. 

यूक्रेन सातत्यानं रशियाच्या बॉम्बर्स विमानांना निशाणा करताना आव्हानांना सामोरं जात होतं. रशिया त्यांच्या लढाऊ विमानांना ज्या ठिकाणी ठेवतं तिथपर्यंत यूक्रेनच्या मिसाईल हल्ला करु शकत नव्हत्या. त्यामुळं ऑपरेशन स्पायडरवेबद्वारे रशियाच्या विमानांवर हल्ले करण्यात यूक्रेनला यश मिळालंय. 

यूक्रेननं कमी खर्चात रशियाचं मोठं नुकसान केल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच एफपीव्ही ड्रोन शेकडो डॉलर्समध्ये मिळतात. याद्वारे रशियाच्या 200 कोटी डॉलर्सचं नुकसान केलं आहे.