Russia Ukraine Conflict : युक्रेन-रशिया संघर्ष सुरु असताना अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. कोणत्याही विशेष कारणाशिवाय सीमावर्ती भागात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. MEAने ट्विट करून असे म्हटले आहे की सर्व भारतीय नागरिकांना भारत सरकारच्या अधिकार्यांशी पूर्व समन्वय न ठेवता सीमेवरील कोणत्याही सीमेवरील चौकीला भेट देऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घरी आणण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावरून रोमानियाची राजधानी बुखारेस्टसाठी विमानाने उड्डाण केले. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केले आणि ते भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजताच्या सुमारास बुखारेस्ट विमानतळावर पोहोचणे अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine Crisis : 1200 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांची माहिती
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha