लंडन : बॉलिवूडमधील रेट्रो संगीताची भुरळ फक्त भारतातच नव्हे, तर परदेशात स्थायिक असलेल्या रसिकांवरही आहे. लंडनमधील एका ड्रायव्हरने बस चालवतानाच हिंदी गाणं गुणगुणायला सुरुवात केली आणि प्रवाशांनाही ठेका धरायला भाग पाडलं.

 

 
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजातील 'कलियों का चमन जब बनता है' हे गाणं साधारण 35 वर्षांपूर्वी चांगलंच गाजलं होतं. लंडनच्या एका सार्वजनिक बसमधील प्रवाशांना मात्र हे गाणं ब्रिटीश चालकाच्या तोंडी ऐकायला मिळालं.

 

 
बसचालकाला बसमधील इतर वादकांनीही साथ दिली. बस ड्रायव्हरने आपल्या पद्धतीने हे गाणं गाण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.

 

 
पाहा व्हिडिओ :