न्यूयॉर्क: ट्विटरने ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी शुल्क लागू केल्यानंतर आता अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने हे शुक्ल भरणार नसल्याचं स्पष्ट केलंय. व्हाईट हाऊसने या संबंधी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ई-मेल केला असून त्यामध्ये ब्लू टिकसाठी एक संस्था म्हणून व्हाईट हाऊसकडून पैसे भरण्यात येणार नाहीत, तसेच कर्मचाऱ्यांच्या पर्सनल अकाउंटसाठीही पैसे भरण्यात येणार नाही असं सांगितलं आहे. ज्याला कुणाला ब्लू टिक कायम ठेवायची आहे त्याने स्वतःच्या खिशातून ही रक्कम भरावी असंही व्हाईट हाऊसच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विटरची ब्लू टिक ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी शुल्क लागू करण्याचं इलॉन मस्क यांनी जाहीर केलं आहे. 


व्हाईट हाऊसच्या वतीनं यासंबंधित सर्व कर्मचाऱ्यांना एक ई-मेल करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, ट्विटर ही एक एंटरप्राईझ सेवा असून संस्थांसाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सेवा देते. यामध्ये आता काही बदल सुरू असून व्हाईट हाऊस त्यावर नजर ठेऊन आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसच्या अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी आम्ही शुल्क भरणार नाही. जर कर्मचाऱ्यांना ही सेवा हवी असल्यास त्यांनी स्वतःच्या खिशातून हे शुल्क भरावं. 


अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे ट्विटर अकाऊंट हे @WhiteHouse या नावाने कार्यरत असून त्याने ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी सबस्क्रिप्शन नाकारलं आहे. 


ट्विटरची ब्लू टीक व्हेरिफिकेशन फक्त प्रसिद्ध प्रोफाईल असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत होती. यामध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटी, शास्त्रज्ञ आदी लोकांचा समावेश होता. इलॉन मस्ककडून ट्विटरच्या सीईओ पदाची धुरा हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय  घेण्यात आले. ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी आता शुल्क मोजावं लागणार आहे, हा त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय आहे. 


ट्विटर ब्लू टिक एक प्रीमियम सर्व्हिस आहे. जी पूर्णपणे पेड आहे. यासाठी मंथली सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक आहे. ट्विटरचे अँड्रॉयड आणि iOS यूजर्ससाठी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी भारतात 900 रुपये मोजावे लागणार आहे येते. तर वेब यूजर्ससाठी याची किंमत फक्त 650 रुपये आहे.  ट्विटर यूजर्स 6 हजार 800 रुपयांचे  वार्षिक सब्सक्रिप्शन घेवू शकता.


शुल्क भरण्याचे फायदे



  • जर तुम्ही  ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घेतले तर तुम्हाला याचे अनेक फायदे होणार आहे. सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्सना ट्विटचे कॅरक्टर लिमिट वढवून देण्यात येणार आहे.

  • थोडक्यात तुम्हाला 180 शब्दसंख्येचे कॅरक्टर लिमिट असणार नाही. 

  • तसेच सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्सना ट्वीट एडिटचा पर्याय देखील उफलब्ध होणार आहे. 

  • ट्विटर  ब्लू सब्सक्रायबरला टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन मिळणार आहे