टेक्सास : अमेरिका पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली. टेक्सासमधील एका चर्चवर रविवारी हल्ला झाला. चर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना, बंदुकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
सदरलॅण्ड स्प्रिंग्जच्या विल्सन कौंटी परिसरातील फर्स्ट बाप्टिस्ट चर्चवर हल्ला झाला. स्थानिक वेळेनुसार हल्लेखोर सकाळी 11.30 वाजता चर्चमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरु केला. एकाच आठवड्यातील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली असून हल्लेखोरालाही कंठस्नान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर चर्चबाहेर सुराक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
अमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने चिरडल्याने 8 जणांचा मृत्यू
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. एफबीआयचे एजंट घटनास्थळी दाखल पोहोचले आहेत.
दरम्यान टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी हल्लाचा निषेध करत मृत आणि जखमींच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं. "टेक्सासच्या इतिहासातील हा सर्वात भयावह गोळीबार आहे," असंही ते म्हणाले.
हल्ल्यातील मृतांमध्ये पाच ते 72 वर्षांपर्यंत नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 20 जण जखमी झाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.
संशयित हल्लेखोर एक श्वेत तरुण असून त्याचं वय 20 ते 30 वर्षांदरम्यान आहे. हल्लेखोर काळ्या कपड्यांमध्ये होता, अशी माहितीही प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
आता बस झालं, आयसिसला अमेरिकेत घुसू देणार नाही : ट्रम्प
दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जपानच्या दौऱ्यावर आहेत. हल्ल्यानतंर नंतर ट्वीट करुन परिस्थितीवर नजर असल्याचं त्यांनी सांगितलं.
"देव सदरलॅण्ड स्प्रिंग्ज, टेक्सासच्या नागरिकांसोबत राहू दे. एफबीआय आणि पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. मी जपानमधून घटनेवर नजर ठेवून आहे," असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे.
अमेरिका पुन्हा हादरली; चर्चमध्ये गोळीबार, 26 मृत्यूमुखी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2017 07:46 AM (IST)
सदरलॅण्ड स्प्रिंग्जच्या विल्सन कौंटी परिसरातील फर्स्ट बाप्टिस्ट चर्चवर हल्ला झाला. स्थानिक वेळेनुसार हल्लेखोर सकाळी 11.30 वाजता चर्चमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरु केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -