मुंबई: सुषमा स्वराज यांनी कारवाईची धमकी दिल्यानंतर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉननं भारतीय तिरंग्याचे पायपुसणे आपल्या साईटवरून हटवले आहेत. पण अद्यापही माफी मागितलेली नाही.
तिरंग्याचं पायपुसणं कॅनडाच्या अमेझॉन साईटवर विकण्यासाठी टाकण्यात आलं होतं. यावेळी एका भारतीयानं यासंदर्भातली माहिती आणि फोटो परराष्ट मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर दिली. यावर सुषमा स्वराज यांनी त्वरित दखल घेत याप्रकाराबाबत अमेझॉननं माफी मागावी असं म्हटलं होतं.
माफी मागितली नाही तर अॅमेझॉनच्या कुठल्याच अधिकाऱ्यांना भारतीय व्हिसा दिला जाणार नाही. असंही स्वराजांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर तिरंग्याचे पायपुसणे अॅमेझॉननं हटवले आहेत.
अमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या तिरंग्यासारख्या पायपुसणीसोबतच इंग्लंडच्या झेंड्याच्या रंगाचीही पायपुसणी विक्रीस ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन या वेबसाईटच्या पेजचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले जात आहेत.
संंबंधित बातम्या:
तिरंग्याची पायपुसणी, अॅमेझॉनवर कडक कारवाईचा केद्रांचा इशारा