मुंबई : यूएसमधील अटलांटा शहरात नवरात्रीनिमित्त श्रीशक्ती मंदिरात एका गरबा इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आडनाव हिंदू 'वाटत' नसल्याचं कारण पुढे करत बडोद्याहून अमेरिकेला शिफ्ट झालेल्या एका वैज्ञानिकासह तिघा जणांना बाहेर हाकलण्यात आलं. 29 वर्षीय करण जानीने ट्वीट करुन हा आरोप केला आहे.

करण जानी हा वैज्ञानिक 2016 मध्ये गुरुत्वलहरींचा शोध घेणाऱ्या यूएसमधील 'लिगो' टीमचा भाग होता. मूळ बडोद्याचा असलेला करण काही वर्षांपूर्वी अटलांटामध्ये स्थायिक झाला. गेल्या सहा वर्षांपासून तो श्रीशक्ती मंदिरात गरबा खेळण्यासाठी जातो, मात्र इतक्या वर्षांत असा अनुभव आला नसल्याचं त्याने सांगितलं.

'तुम्ही हिंदू दिसत नाही. आयडीवरील तुमची आडनावं हिंदू वाटत नाहीत. त्यामुळे तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही' असं गरबा आयोजकांनी सांगितल्याचं करणने ट्विटरवर लिहिलं आहे. 'माझा कोकणी मित्र गरब्यात सहभागी होण्यासाठी आला होता, मात्र आम्हाला बाहेर काढलं' असा दावा करणने केला आहे.